२४ तासांत देशभरात १९ हजार ७८ नव्या रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली :   मागील २४ तासांत देशभरात १९ हजार ७८ नवे कोरोनाबाधित आढळले, तर २२ हजार ९२६ जण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, करोनामुळे २२४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख ५ हजार ७८८ वर पोहचली आहे.

 

सद्यस्थितीस देशात २ लाख ५० हजार १८३ अॅक्टिव्ह केसेस असून, ९९ लाख ६ हजार ३८७ जण आतापर्यंत करोनातून बरे झालेले आहेत. याशिवाय, करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १ लाख ४९ हजार २१८ वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

 

दरम्यान,करोना विषाणू संसर्गाच्या सावटाखाली असलेल्या भारतीयांसाठी चांगली बातमी काल(शुक्रवार) समोर आलेली आहे. ऑक्सफर्ड- अॅमस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि सीरम संस्थेने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली आहे.

 

‘कोव्हिशिल्ड’ला मंजुरी

देशभरात आज(शनिवार) होणाऱ्या लसीकरणाच्या सराव फेरीच्या पाश्र्वभूमीवर काल केंद्रीय औषध मानक नियामक संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीची बैठक झाली. या बैठकीत ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली असून, आता भारताच्या महाऔषध नियंत्रकांच्या (डीसीजीआय) परवानगीची प्रतीक्षा आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी मिळवणारी ही पहिली लस ठरणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.