नवी दिल्ली : कोरोना जागतिक साथीपासून देशाला वाचवण्यासाठी अत्यंत निकडीच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. दि. 22 मार्चला जनता संचारबंदी सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत पाळा. त्यादिवशी कोरोनाशी लढणाऱ्या सेवांसाठी दुपारी पाच वाजता पाच मिनिटे खिडकीत, बाल्कनीत उभे राहून टाळ्या, थाळ्या किंवा घंटा वाजवून आभार माना, देशात जिवनावश्यक वस्तूंची कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, त्यामुळे नागरिकांनी विनाकारण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी रात्री आठ वाजता देशांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोना सारख्या अद्याप औषध न सपाडलेल्या साथीला पराभूतर करण्यासाठी संकल्प आणि संयम या दोन अक्षरी मंत्रांनी आपण या साथीला पराभूत करू शकतो. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सुचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे संकल्प करावा. गर्दीपासून लांब राहण्याचा संयम, घरातून बाहेर पडण्याचे टाळण्याचा संयम पाळून कोरोनाच्या साथीला पराभूत करू शकतो. अलीकडे ज्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणतात, ते अवश्य करावे. कोरोनाच्या पराभवासाठी संकल्प आणि संयमाची गरज आहे, असे ते म्हणाले
आपल्याला काही होणार नाही, असे वाटत असेल आणि म्हणून आपण रस्त्यावर फिरणार असाल अणि आपल्याला कोरोनाची बाधा होणार नाही असे वाटत असेल तर ते वाटणे चुकीचे आहे. माध्यम, रुग्णालय, पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांना बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यांच्याशिवाय अन्य कोणी बाहेर पडू नये, असे आवाहन केले. घरातील 60 वर्षाच्या पुढील ज्येष्ट नागरिकांनी कोणत्याही कारणाने घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.
या संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील नागरिकांनी काही आठवडे आणि काही काळ मला द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, 22 मार्चला रविावरी कोणीही घराबाहेर पडू नये. जनतेने आपणहून या कर्फ्यूत सहभागी व्हावे, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, रेल्वे, बसचालक, होम डिलिव्हरी करणारे हे सारे स्वत:चा जीव संकटात घालून मोठी सेवा बजावत आहेत. त्यांना सलाम करण्यासाठी पाच वाजता आपल्या खिडकीत, बाल्कनीत उभे राहून टाळ्या, थाळ्या किंवा घंटा नाद करून या लोकांना सलाम करावा, स्थानिक प्रशासनाने भोंगा वाजवून जनतेला त्याची आठवण करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या साथीत मध्यम, अर्धमध्यम आणि गरीब वर्गावरही मोठा घाला आला आहे. त्यामूळे ते कामावर न आल्यास त्यांचा पगार कापू नये, असा सल्ला देत त्यांनाही आपला परिवार चालवायचा आहे, अशी जाणीव त्यांनी करून दिली. त्याचबरोबर देशांत दूध, खाण्या पिण्याच्या गोष्टी औषधे कमी पडू नये म्हणून काळजी घेत आहोत. त्यामुळे या वस्तूंचा अनावश्यक साठा करू नका, असे आवाहन मोदी यांनी केले.
आपल्या काही अनावश्यक शस्त्रक्रियांसाठी आपण तारीख ठरवली असेल तर ती पुढे ढकलावी. जर आपण नेहमीच्या तपासणीसाठी जाणार असाल तर काही दिवस जाऊ नका. आपल्याला काही शंका असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडून डॉक्टरांशी फोनवर सल्ला घ्या, असे ते म्हणाले. अत्यावश्यक सेवेवर दबाव वाढू नये यासाठी ही काळजी घ्यावची, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने कोरोनामुळे येणाऱ्या आर्थिक संकटांचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक प्रतिसाद टास्क फोर्स निर्माण करण्यात येणार आहे.
देशातील नागरिकांनी आपली जबाबदारी सांभअळत आपले योगदान दिले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.