२००० शेतकऱ्यांच्या मका खरेदीला गोडाऊनचा अडथळा

0

राष्ट्रवादीकाँग्रेसचे तहसीलदारांकडे निवेदन।

जामनेर(प्रतिनीधी):-तालुकाभरातील सुमारे दोन हजारावर मका उत्पादक शेकऱ्यांनी शेतकी संघाकडे अनेक दिवसांपासुन नोंदणी केलेली असली तरी आज पर्यंत त्यांच्या मालाची मोजणी केवळ गोडाऊन उपलब्ध नसल्याच्या सबबीखाली होऊ शकली नाही. त्यामुळे लकरात-लवकर गोडाऊन उपलब्ध करून शेतकऱ्यांचा मका मोजण्यात यावा अशा आशयाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तहसिलदारांना लेखी निवेदन सादर केले.आतापर्यंत २००९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी फक्त १० ते १५ शेतकऱ्यांचा मका अद्याप मोजण्यात आला आहे.

त्यातहीमर्जीतील बनावट शेतकरीच जास्त असुन,व्यापाऱ्यांचाच मका वशीलेबाजीने मोजला गेला आणी खऱ्या व अस्सल शेतकऱ्यांना डावलुन गोडाऊन उपलब्ध नसल्याच्या मुद्यावर टातकळत ठेवले जात असल्याचा आरोपही दिलेल्या निवेदनामधे करण्यात आला आहे.पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मका कुठे ठेवायचा हाच मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.नायब तहसिलदार सुभाष कुंभार यांनी हे निवेदन स्विकारले.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, विलास राजपुत, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष संदीप हिवाळे,प्रल्हाद बोरसे,हिंमत राजपुत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.