रेल्वे प्रवाशांना दिलासा : कोरोना नियमांचे पालन करावे लागणार
भुसावळ (प्रतिनिधी )- रेल्वे गाड्यांना रेल्वे प्रवाशांची वाढत असलेली गर्दी पाहता गैरसोय टाळण्यासाठी नव्याने दहा गाड्या (अप-डाऊन) मार्गावर 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असल्याने आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या गाड्यांमध्ये प्रवेश दिला जाणार असून कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
मुंबई-मनमाड विशेष एक्स्प्रेस
02109 मुंबई-मनमाड विशेष एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज पहाटे 6.15 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी मनमाड येथे रात्री 10.50 वाजता पोहोचणार आहे तर 02110 विशेष गाडी मनमाड येथून दररोज 6.02 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 10.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
मुंबई-नागपूर दुरंतो विशेष गाडी
02189 मुंबई-नागपूर दुरंतो विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 8.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी नागपूर येथे दिवशी 07.20 वाजता पोहोचणार आहे. 02190 विशेष गाडी नागपूरहून दररोज 8.40 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 08.05 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला इगतपुरी व भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-नागपूर विशेष सुपरफास्ट
02041 पुणे-नागपूर विशेष सुपरफास्ट विशेष गाडी दर गुरुवारी पुणे येथून 10 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी नागपूरला 1.10 वाजता पोहोचणार आहे. 02042 सुपरफास्ट विशेष गाडी दर शुक्रवारी नागपूर येथून 3.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पुणे येथे 6.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-नागपूर विशेष सुपरफास्ट
02041 पुणे-नागपूर विशेष सुपरफास्ट गाडी दर गुरुवारी पुणे येथून 10 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी नागपूर येथे 1.10 वाजता पोहोचणार आहे. 02042 सुपरफास्ट विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी नागपूरहून 3.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पुण्याला 6.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-अजनी विशेष गाडी
02239 पुणे-अजनी विशेष गाडी दर शनिवारी पुणे येथून 10 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 12.50 वाजता अजनी येथे पोहोचणार आहे. 02240 विशेष गाडी दर रविवारी अजनीहून 7.50 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पुण्याला सकाळी 11.05 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड, कोपरगाव (केवळ 02240 साठी), मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-अमरावती विशेष
02117 पुणे-अमरावती विशेष गाडी दर बुधवारी पुणे येथून 3.15 वाजता सुटल्यानंतर सुटेल दुसर्या दिवशी अमरावती येथे 2.55 वाजता पोहोचणार आहे. 02118 विशेष गाडी दर गुरुवारी अमरावतीहून 6.50 वाजता सुटल्यानंतर पुणे येथे दुसर्या दिवशी सकाळी 07.20 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-अजनी विशेष गाडी
02223 पुणे-अजनी विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून 3.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी अजनी येथे 4.50 वाजता पोहोचणार आहे. 02224 विशेष गाडी दर शुक्रवारी अजनी येथून 7.50 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पुण्याला सकाळी 11.35 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा (केवळ 02224 साठी), अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
मुंबई-आदिलाबाद विशेष गाडी
01141 मुंबई-आदिलाबाद विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 6.35 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी आदिलाबाद येथे 9.30 वाजता पोहोचणार आहे. 01142 विशेष गाडी आदिलाबाद येथून दररोज 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 5.35 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड (केवळ 01142 साठी), परभणी, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, बोधडी बुजुर्ग, किनवट रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.