जळगांव – वरील विषयान्वये दि. १९ फेब्रुवारी २०२० सार्वजनिक शिवजयंती निमित्त दि.१५ फेब्रुवरी २०२० ते २० फेब्रुवारी २०२० पर्यंत विविध कार्यक्रमचे आयोजन मॉ भटाई इस्टेट ब्रोकर्स आणि डेव्हलपर्स,जळगांव,आई जिजाऊ,माता रमाई फाऊंडेशन, मेहरुण,नवदुर्गा मित्र मंडळ,सदाशिव नगर, श्रीराम माध्यमिक विदयालय, मेहरुण,आणि एम.आय.डी.सी.परिसर मित्र मंडळ, यांचे संयुक्त मित्र मंडळा तर्फे आयोजित करण्यात येत आहे.
त्यात प्रामुख्याने दि.१५ रोजी गृहकुल नगर येथील प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप,दि.१६ रोजी सिव्हील हॉस्पिटल,जळगांव येथे रुग्णांना फळ वाटप,दि.१७ रोजी रेल्वेस्टेशन येथे कंबल वाटप दि.१८ रोजी संत चोखामेळा वस्तीगृह येथे अन्नदान तसेच,दि.१९ फेब्रुवारी बुधवार रोजी ठिक-४.०० वाजता भव्य-दिव्य मिरवणुक ढोल-ताशेचे गजरात रेमंड चौफुली-गृहकुल सोसायटी-काशिनाथ लॉज-उपासनी नगर-राम नगर-अशोक किराणा तसेच सदाशिव नगर,संतोषी माता चौक मेहरुण,जळगांव येथे मिरवणुक समाप्ती करण्यात येईल. दि.२० फेब्रुवारी-२०२० रोजी रिमांड होम येथे अन्नदान करण्यात येईल.तसेच,कार्यक्रम यशस्वीतेसाठी मॉ भटाई चे प्रदीप पाटील,ईश्वर ढिवरे,रवी सोनवणे, मिलिंद
पाटील,रियाज पटेल,गौतम वानखेडे,अशोक पाटील आणि निलेश सपकाळे आणि समस्त एम.आय.डी.सी परिसर परिश्रम घेत आहेत.
