Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»१८ वर्ष वय पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत नांव नोंदणी करून घ्यावी
    जळगाव

    १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत नांव नोंदणी करून घ्यावी

    By November 20, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा – भडगाव १८ – विधानसभा क्षेत्रातील ज्या युवकांचे वय १८ वर्ष पुर्ण झालेले असेल त्या मतदारांनी आपले नांव आपआपल्या मतदार संघातील बी.एल.ओ. यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत नोंदवुन घ्यावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील आणि तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.

    याबाबत उपविभागीय कार्यालयाकडुन मिळालेली माहीती नुसार पाचोरा – भडगाव  १८ – विधानसभा या मतदारसंघातील १ जानेवारी २०२१ रोजी ज्या युवकांचे वय १८ वर्ष पुर्ण होत असेल. तसेच त्याआधी १८ वर्ष वय पुर्ण झाले आहे. अशा युवकांनी जर मतदार यादीत नाव नोंदणी केली नसेल त्यांनी आपल्या शहरातील मतदान केंन्द्र व प्रभाग निहाय तसेच गावात नेमणुक करण्यात आलेल्या बी.एल.ओ. यांच्याकडे अथवा आॅनलाईन नमुना नं. ६ तील अर्ज भरुन निःशुल्क मतदार याद्यांमध्ये नांव नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सादर करून आपले नांव मतदार यादीत नोंदणी करून घ्यावी. तसेच ज्या मतदारांना नावाच्या अथवा छायाचित्राच्या तपशिलात काही बदल करायचे असतील त्यांनी नमुना – ८ भरुन आवश्यक बदल करणेसाठी अर्ज करावा. व विधानसभा क्षेत्रातील पत्त्यात बदल करायचा असल्यास नमुना – ८ ‘अ’ अर्ज भरुन पत्त्यात बदल अथवा दुरुस्ती करून घ्यावी. याकरीता मुख्य निवडणुक आयुक्त, मुंबई यांच्या आदेशान्वये पाचोरा – भडगाव १८ – विधानसभा मतदारसंघातील नांव नोंदणीची निवडणुक प्रक्रीयापुर्ण करण्यासाठी एकुण यादी भाग – ३२८ नुसार ३२८ बी.एल.ओं. ची नेमणुक करण्यात आली आहे. या निवडणुक मतदार नांव नोंदणीच्या राष्ट्रीय कार्यात जागृत नागरीकांनी व युवकांनी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात आपला सहभाग नोंदवुन आपआपल्या क्षेत्रातील व परिसरातील १८ वर्ष पुर्ण झालेल्यांची मतदार यादीत नांव नोंदणी करून आपल्या देशातील लोकशाही बळकट करणाऱ्या मतदार नोंदणी अभियानास यशस्वी करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे व निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार संभाजी पाटील यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif