Friday, September 30, 2022

१६ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

जळगाव शहरात १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. २० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाली.  मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतू ती आढळून आलेली नाही.

दरम्यान तीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा आरोपी मुलीच्या आईने केला आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता मुलीच्या आईने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या