Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»१४ जूनपासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक काळ्या फिती लावून काम करणार
    जळगाव

    १४ जूनपासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक काळ्या फिती लावून काम करणार

    By June 12, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कुऱ्हा काकोडा, ता.मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि ०४ हजार गटप्रवर्तक गेल्या १० ते १२ वर्षांपासून कार्यरत आहेत.आशा स्वयंसेविकांना सुमारे ८० पेक्षा जास्त विविध प्रकारची कामे करावी लागतात.त्याबदल्यात त्यांना कामानुसार मोबदला अदा केला जातो तर गटप्रवर्तकांना दरमहा प्रवासभत्ता म्हणून ७५००/- ते ८२००/- रूपये अदा केले जातात.

    आशाताईंमुळे घराघरांत आरोग्य सेवा पोहचली.शिवाय कोरोनाच्या महामारीत जिवाची पर्वा न करता शासनाच्या तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनासंबंधित सर्व कामे आघाडीने करीत आहेत. असे असतांनाही शासन त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे म्हणून आशाताई आणि गटप्रवर्तकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

    परिणामी आपल्या खालील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक दि.१४     जून २०२१ पासून मागण्या मान्य होईपर्यंत काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

    या आहेत मागण्या 

    १) आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक आठवड्याभर दररोज आठ तासांपेक्षा जास्त काम करत असून त्यांचे काम अत्यंत आवश्यक असल्याने त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यात यावे.

    २) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाशर्ती लागू करेपर्यंत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना किमान वेतनाइतके वेतन देण्यात यावे.

    ३) आशा स्वयंसेविका नियमित कर्मचारी नसल्याने त्यांना रॅपिड ॶॅंटिजेन चाचणी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये.                      ४) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी भाऊबीज भेट देण्यात यावी.

    ५) कोरोनाने बाधित होऊन म्रुत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकांच्या वारसांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांचा लाभ देण्यात यावा.

    ६) दि.१७ जुलै २०२० रोजीच्या शासन आदेशानुसार दरमहा मानधनवाढ लागू करण्यात यावी.

    ७) आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना कामकाज करण्यासाठी मोबाईल व लॅपटॉप पुरविण्यात यावेत.

    ८) आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सादिल(स्टेशनरी) खर्च आणि मोबाईल रिचार्जची रक्कम वाढविण्यात यावी तसेच गणवेशासाठी १२००/- ऐवजी २०००/-रुपये करण्यात यावे.

    ९) आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून त्यांना दरमहा पेन्शन लागू करण्यात यावे.

    १०) आशा स्वयंसेविकांना कामाचा थकीत मोबदला तात्काळ अदा करून यापुढे दरमहा वेळेवर अदा करण्यात याव.                            ११) आशा स्वयंसेविकांना दारिद्र्य रेषेखालील आणि वरील असा भेदभाव न करता कामाचा  सरसकट मोबदला अदा करण्यात यावा.

    यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यांतील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक दि.१४ जुन २०२१ पासून मागण्या मान्य होईपर्यंत शासनाचा निषेध व्यक्त करत काळ्या फिती लावून काम करतील.

    असा निर्णय संघटनेने घेतला आहे.त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी काळ्या फिती लावून काम करावे तसेच आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन आप आपल्या तालुका आरोग्य अधिकारी यांना सादर करतील असे मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif