१३५८ विशेष शिक्षक व ७२ परिचरांचे समायोजन करण्याबाबत आ. अनिल पाटलांना निवेदन

0

अमळनेर (प्रतिनिधी):- अपंग समावेशीत शिक्षण योजना (माध्य.स्तर) अंतर्गत सन २००९ नंतर नियुक्त कार्यरत १३५८ विशेष शिक्षक व ७२ परिचरांचे समायोजन करणेबाबत आमदार अनिल पाटील यांना संबंधित शिक्षकांकडून निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये अपंग समावेशीत योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यात १३५८ विशेष शिक्षक व ७२ परिचर यांच्या रितसर नियुक्त्या करण्यात आल्या.परंतु ७ जुलै २०१५ च्या शासन परिपत्रकानुसार योजनेत कार्यरत विशेष शिक्षक व परिचर यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या परिणामी संबंधितांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई,खंडपीठ औरंगाबाद येथे शासनाच्या आदेशाला आव्हान दिले.खंडपीठाने शिक्षक व परीचारांच्या बाजूने निर्णय देत सेवा समाप्ती बाबतची कार्यवाही रद्द बातल ठरवली.

सर्व विशेष शिक्षक व परिचर यांच्या युनिट व वैक्तिक मान्यतेसह त्यांच्या सेवा शाळा स्तरावर पुनर्स्थापित करण्याबाबतचे व दोन महिन्यात संपूर्ण थकीत वेतन अदा करण्याचे महत्तवपूर्ण निर्देश शासनास दिले.तरीदेखील समायोजनाच्या कार्यवाहिला शासन, प्रशासन स्तरावरून वेगवेगळे विषय सामोरे करून वारंवार बेदखल करत आहे.परंतु बराच काळ लोटूनही शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही.

विशेषशिक्षक व परीचरांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असुन आजपर्यंत १३ विशेष शिक्षक या शासकीय मनस्तापामुळे मृत पावलेले असून लवकरात लवकर खालील मागण्या मान्य करण्यात याव्यात १३५८ विशेष शिक्षक व ७२ परिचर यांचे शासनाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनाच्या अधीन स्तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील रिक्त पदी समायोजन करण्यात यावे तसेच मागील थकीत व नियमित वेतन लवकरच अदा करण्यात यावे अन्यथा संबंधित शिक्षक व परीचरांकडून टोकाचे पाऊल उचलले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदन देतेवेळी संघटनेचे विनोद पाटील पी.आर.पाटील, सिमा पाटील, प्रविण सोनवणे, दिनेश पाटील, पंकज काटे, सुनिता पाटील, शशिकांत भदाणे, पराग मोरे, अनंता महाजन, महेंद्रसिंग पाटील,उमेश भदाणे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.