एरंडोल प्रतिनिधी….
एरंडोल:-१२ मेपासून गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी चे आवर्तन सुटणार आहे. या आवर्तनासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी १३५० द.ल.घ.फु. पाणी साठा आला मंजुरी दिली आहे अशी माहिती एरंडोल येथील गिरणा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी मकरंद अत्तरदे यांनी दिली आहे
या अर्वतना चा कालावधी आठ दिवसाचा असेल या वर्तनामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा ,एरंडोल जळगाव, धरणगाव या तालुक्यातील नदीकाठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तसेच गुरा ढोरांच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. या अर्वतना मुळे जवळपास दोन ते अडीच महिने पिण्याच्या पाण्याची ची सोय होणार आहे. तसेच गिरणा नदी पात्रातील दहिगाव,जामदा, पाचोरा केटी वेअर, लमांजन बंधारा, दापोरा इत्यादी बंधारे पाण्याने पूर्ण भरून पोहर होणार आहेत.