१२ आमदारांच्या नियुक्ती बाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे आदेश

0

मुंबई ;-राज्यपाल नियुक्त विधान परिषदेमधील बारा आमदारांच्या नियुक्ती वरील स्थगिती उठण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता तसेच राज्य सरकारने या नियुक्त तातडीने करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देखील समोर आले होते.

याबाबत न्यायालयात आधीच्या मुख्य याचिकाकर्त्यांनी या प्रकरणांमध्ये याचिका मागे घेतल्यानंतर दुसरे याचिका करते सुनील मोदी यांना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिल्याने नवे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अधिपत्याखाली आज याबाबत सुनावणी झाली.

यावेळी न्यायमूर्ती उपाध्याय यांनी राज्य सरकारला यासंदर्भात दहा दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी शिफारस केलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत परिस्थिती जैसे थे ठेवण्याच आदेश न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.