लासुर ता.चोपडा (वार्ताहर) महात्मा फुले यांनी आपले विचार तळागाळातल्या समाज पर्यंत पोचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, संसार, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, छत्रपती शिवाजी महाराज यांन वरील पवाडा इत्यादी अमोल ग्रंथनिर्मिती केली. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. त्या प्रमाणे त्याचे अनुलोकन करून, समस्त मानव जातीला त्यांचे आचार विचार पटऊन त्या प्रमाणे वागून, जाती भेदाचे राजकारण बाजूला ठेऊन त्यांनी संपूर्ण मानव जातीला जगण्याचा, वागण्याचा एक संदेश दिला आहे.
फुलेंनी आपले आयुष्य समाजासाठी देत असतानाच दिनांक 11 मे 1888 रोजी महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहाद्दूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने लाखोंच्या उपस्तीत फुले यांना महात्मा ही पदवी बहाल केली. त्या वेळे पासून देश त्यांना महात्मा ज्योतिराव फुले म्हणून ओळखू लागली आहे. सन 2016 पासून श्री संत सावता माळी युवक संघ 11 मे हा “महात्मा दिन” म्हणून मोठया उत्साहाने लोकाभिमुख / जनहितार्थ उपक्रम तसेच त्यांचे कार्य, त्यांचे विचार लोकां पर्यंत पोहचऊन साजरा करत आहे. मागच्या वर्षी 18 जिल्ह्यमध्ये 11 मे – महात्मा दिन म्हणून साजरा केला, शासन दरबारी सुद्धा हा दिवस 11 मे – महात्मा दिन म्हणून साजरा करावा ह्या साठी निवेदन देऊन आम्ही सर्व जन प्रयत्न करत आहे.
तरी हा दिवस राज्य सरकारने सुद्धा प्रशासकीय स्तरावर “महात्मा दिन” म्हणून साजरा करावा यासाठी चोपडा तहसिलदार यांना या आशयाचे मागणी चे निवेदन श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य खान्देश विभागीय अध्यक्ष जितेंद्र महाजन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई महाजन, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी, शहर अध्यक्ष दशरथ महाजन, तालुकाध्यक्ष राजू भाऊसाहेब, तालुका उपाध्यक अल्केश महाजन, तालुका संपर्क प्रमुख समाधान माळी, शहर सचिव विठ्ठल माळी आदी पदाधिकारी यांनी दिले