Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»११ बैलांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक; दोन जणांना अटक
    गुन्हे वार्ता

    ११ बैलांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक; दोन जणांना अटक

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 7, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    एमआयडीसी पोलीसांनी नशिराबाद ते औरंगाबाद रोडवरील उमाळा फाट्याजवळील बसस्थानकाजवळून ट्रकमध्ये बेकायदेशीररित्या ११ बैलांना निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणारे ट्रक मालक व चालक यांना रात्री १० वाजता अटक केली आहे. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नशिराबाद औरंगाबाद रोडवरून ट्रकमध्ये ११ बैल निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता निशराबाद -औरंगाबाद रोडवरील उमाळा फाट्याजवळ ट्रक क्रमांक (एमएच ४६ एएफ ५५५४) ची तपासणी केली असता. त्यात निर्दयीपणे कोंबून विनापरवाना ११ बैल कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली.

    त्यानुसार ३ लाख ३० हजार रूपये किंमतीचे ११ बैलांची सुटका करण्यात आली. तर १ लाख रूपये किंमतीचा ट्रक एमआयडीसी पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणा ट्रक चालक आसिफ उस्मान समा (वय ३०, रा. मेहरूण) आणि मालक तन्वीर शेख सुपडू (वय २३,  रा. मास्टर कॉलनी) यांना अटक केली आहे.

    याप्रकरणी समाधान पाटील रा. कांचन नगर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करत आहे. ही कारवाई सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, रविंद्र चौधरी, हवलदार जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी केली.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif