Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»११ कोटींच्या फसवणूक प्रकरणी भोसरीत जळगावच्या तिघांविरुद्ध गुन्हा
    गुन्हे वार्ता

    ११ कोटींच्या फसवणूक प्रकरणी भोसरीत जळगावच्या तिघांविरुद्ध गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2023No Comments7 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे जळगाव :-भागीदारीत बांधण्यात (Bhosari ) आलेल्या प्रकल्पातील 62 दुकाने परस्पर नावावर करून घेत 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 24 मे रोजी सेक्टर 11, भोसरी येथे घडला.

    प्रदीप पोपटलाल कर्नावट (वय 53, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत मणिलाल संघवी (वय 55), संदेश मिश्रीलाल चोपडा (वय 54), प्रमोद भाईचंद रायसोनी (तिघे रा. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी पी 3 डेव्हलपर्स भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या प्रसन्न गोल्डफिल्ड या प्रकल्पातील 62 दुकाने त्यांच्या स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे केली.

    फिर्यादी यांनी दिनेश पारसकुमार मेहता, संजय मुल्तानचांद कासवा, संजय रमणभाई पटेल यांना आगाऊ रक्कम घेऊन काही दुकानांची विक्री केली होती.

    आरोपींनी 11 वेगवेगळ्या दस्ताद्वारे करारनामा करून 62 दुकाने त्यांच्या संस्थेच्या नावावर केली. त्यात फिर्यादी यांनी विक्री केलेल्या 16 दुकानांचा समावेश आहे.

    आरोपींना अधिकार नसताना 11 कोटी 23 लाख 20 हजार (Bhosari) रुपयांचा अपहार करून 62 दुकाने, ऑफिसेस स्वताच्या वैयक्तिक फायद्यासाठी स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावावर करून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

    #crime bhosari jalgaon pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif