जळगाव :- अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या केटामाइनचा सुमारे १.२ टनचा साठा केंद्रीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जळगावात डिसेंबर २०१३ मध्ये पकडला होता. याप्रकरणी १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात ७ जणांना दाेषी ठरविण्यात अाले अाहे तर ५ जणांना निर्दाेष मुक्त करण्यात अाले. गेल्या पाच वर्षापासून या खटल्याचे कामकाज जळगाव न्यायालयात सुरू हाेते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत ११८ कोटी रुपये हाेती. जळगाव येथील उमाळा शिवारात आणि औद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रीज येथे छापा टाकून डीआरआय पथकाने ११७५ किलो केटामाइन जप्त केले हाेते.