१० दिवसांत सगळं झालं ; खडसेंनी सांगितल्या ‘आतल्या’ घडामोडी

0

जळगाव : जळगाव महानगर पालिकेमध्ये सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का देत शिवसेनेनं भगवा फडकावला आहे. हा भाजपासोबतच जळगावमध्ये ज्यांचं प्रस्थ मानलं जातं, ते भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांचं मोठं अपयश म्हटलं जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव महापालिकेतील विजयाचा फॉर्म्युला सांगितला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीविषयी देखील ते बोलले आहेत.

केवळ १० दिवसांत हे सगळं झालं. याबाबत कुणाला जास्त माहिती नव्हती, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.  कामे होत नसल्यामुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता नाराज होती. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावाच लागला नाही, असे खडसे यांनी सांगितले.

जळगाव महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात १० दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन, नगरसेवक जमू शकतात. एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातील काही नगरसेवक मला आधीच भेटून गेले होते. मग हा सगळा प्लॅन ठरला, असे खडसेंनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.