ह.भ.प. भाऊराव महाराज यांची वारकरी मंडळ कोषाध्यक्षपदी निवड

0
न्हावी, ता. यावल वार्ताहर -अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी  मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले यांनी नुकतीच जाहीर केली त्यामध्ये राज्याचे अध्यक्ष म्हणून ह भ प सुधाकर महाराज इंगळे सोलापूर, उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब बोधले उस्मानाबाद व कोषाध्यक्ष म्हणून ह भ प भाऊराव महाराज पाटील सर मुक्ताईनगर यांची एकमताने निवड करण्यात आली ह.भ.प भाऊराव महाराज पाटील सर हे या मंडळाच्या स्थापने पासून विविध पदांवर कार्यरत आहेत आता पर्यंत त्यांनी जळगाव जिल्हा अध्यक्ष , खान्देश विभागीय अध्यक्ष या पदावर यशस्वी पणे कार्य केलेले आहे .उत्कृष्ट असे वारकऱ्यांचे संघटन त्यांनी या माध्यमातून केलेले आहे.त्यांच्या या कार्याची दखल मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले यांनी घेऊन त्यांना राज्याचे कोषाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे.त्यामुळे अनेक महाराज,वारकरी,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिकारी समाज्याच्या सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.वारकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असे महाराजांनी या प्रसंगी सांगितले . कोषाध्यक्ष   पदी  निवड झाल्याबद्दल ह.भ.प भरत महाराज म्हैस वाडी कर जिल्हाध्यक्ष अ. भा. वा. मंडळ जळगांव ,भानुदास महाराज पाटील सचिव अ. भा. वा. मंडळ जळगांव जिल्हा ह.भ.प. गजानन महाराज वर्साडे कर विभागीय उपाध्यक्ष  ह.भ.प. भागवत महाराज कदम, जीवन महाराज राऊळ, अमोल महाराज मुकेश  महाराज दीपक महाराज रेलकर दिनेश महाराज चिखलीकर आर ए पाटील सर सी एस पाटील सर निवृत्ती पाटील संतोष मराठे नगरसेवक यांनी कौतुक केले आहे
Leave A Reply

Your email address will not be published.