Saturday, October 1, 2022

हॉस्पिटलच्या चिल्ड्रेन वार्डमध्ये भीषण आग; चार मुलांचा मृत्यू

- Advertisement -

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये  सोमवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेत  आतापर्यंत चार मुलांचा मृत्यू झाला असून एकूण 36 मुलांना बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे. ही आग सिलिंडर फुटल्याने लागली असल्याचे सांगितले जाता आहे.

- Advertisement -

- Advertisement -

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर मुलांचा वॉर्ड आहे. आग लागत्यानंतर अनेक रूग्णांना स्ट्रेचरमधून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तर, मुलांच्या कुटुंबीयांना आत प्रवेश दिला जात नाही. अशा स्थितीत आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी गोंधळ उडाला. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. धुराचे प्रचंड लोट असल्याने आग विझवणे कठीण जात आहे. फतेहगड, बैरागढ, पुल बोगदा आणि इतर अग्निशमन केंद्रातील आठ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत.

या आगीची माहिती मिळताच मंत्री विश्वास सारंग आणि डीआयजी इर्शाद वलीही घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांच्या पथकाला रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रात्री उशिरा वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी या घटनेची अधिक माहिती दिली. या घटनेत ४ मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एकूण ४० मुलं हॉस्पिटलमध्ये दाखल होती. त्यापैकी ३६ मुलं सुरक्षित आहेत. मृत मुलांच्या पालकांना ४ लाखांची मदत दिली जाईल, असं मंत्री सारंग यांनी सांगितलं.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या