Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»हॉकर्स आणि पार्किंग समस्या जैसे थे!
    जळगाव

    हॉकर्स आणि पार्किंग समस्या जैसे थे!

    By August 28, 2018No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    प्रतीकात्मक फोटो
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जळगाव शहर झपाट्याने वाढते आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांसाठी  जळगावात येतात. जळगाव शहरातील रस्ते विविध प्रकारच्या अतिक्रमणाने व्यापलेले आहेत. जळगावातील हॉकर्स आणि पार्किंग या दोन्ही  समस्या बिकट बनल्या आहेत. मुख्य बाजारपेठेत जिकडे- तिकडे मोटारसायकली,चारचाकी वाहने तसेच ऑटोरिक्षाचे जाळे पसरलेले दिसून येते. त्यामुळे पादचार्‍यांसाठी रस्त्याने चालणष जिकरीचे जाते. शहरात फुले मार्केट, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट, बी.जे. मार्केट या मार्केटमध्ये बाजारासाठी येणार्‍यांना आपली वाहने कुठे लावावी हा पहिला प्रश्न त्यांच्यासमोर ऑ वासून ुभा राहतो.  या मार्केटचे बांधकाम करताना पार्किंगसाठी पुरेशी जागा सोडूनच बांधकामाला परवानगी द्यायला हवी. परंतु तशी ती दिली गेली नसल्याने आज फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर योग्य ती उपाययोजना केली नाही तर येत्या काही वर्षात पार्किंगची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यासाठी महापालिका आणि नगररचना विभागातर्फे आता यापुढे नव्या बांधकामांना परवानगी देण्याआधी पार्किंगच्या पुरेशा जागेचा त्यात समावेश असेल तरच परवानगी दिली तरच त्यावर नियंत्रण आणणे शक्य होईल. परंतु अनेक वेळा या नियमांचे बांधकाम व्यवसायिकांकडून  पालन केले जात नसले तरी त्यांना बांधकामाची परवानगी मिळते नव्हे मिळविली जाते. अशा प्रकारच्या परवानगी मिळाल्यामुळेच पार्किंगची समस्या निर्माण झालेली आहे. त्याला जबाबदार संबंधित शासकीय अधिकारीच आहेत, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. जळगाव शहरातच नव्हे तर अन्य शहरातही उद्भवणार्‍या वाहन पार्किंगचा प्रश्न वाहतूक पोलीस खात्याच्या मदतीने महानगरपालिकेने हा प्रश्न सोडविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी रस्त्यावर उभी राहणारी वाहने जर शिस्तबद्धरितीने उभी केली गेली तर पार्किंगचा निम्मा प्रश्न सुटू शकतो. पण त्यासाठी कडक शिस्त लावण्याची गरज आहे. कारण दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे हे याबाबतीत नियोजन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश येवो, हीच अपेक्षा
    शहरातील पार्किंगच्या समस्येइतकीच गंभीर समस्या हॉकर्स या किरकोळ विक्रेत्यांची आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर हॉकर्सचे अतिक्रमण असल्याने या रस्त्यावरुन नागरिकांना जाणे- येणे जिकिरीचे होऊन बसले आहे. यापुर्वी हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन तयार करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीपुर्वी या झोनची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. तत्कालिन  आयुक्त जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कठोर भूमिका घेतलेली होती. शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, महात्मा गांधी मार्ग, शिवाजी रोड, पोलन पेठ आदी भागातील हॉकर्संना पर्यायी जागा देऊन त्यांना या भागात विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्याचा परिणाम या भागातील रस्ते रहदारीसाठी मोकळे झालेले होते. परंतु महापालिकेची निवडणुक झाली. नवीन बॉडी अद्याप अधिकृतरित्या अस्तित्वात आलेली नाही. 17 सप्टेंबरला नवीन महापौरांची निवड होणार असली तरी नवीन निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी  नो हॉकर्स झोनच्या  ठिकाणी पुन्हा हॉकर्स बसण्याची स्वत:च्या अखत्यारित परवानगी दिल्याने नो हॉकर्स झोनमध्ये पुन्हा हॉकर्सची गर्दी सुरु झालेली आहे. हॉकर्सचे पोय त्यांच्या मेहनतीने केलेल्या कमाईवर अवलंबून असते. म्हणून हॉकर्स व हॉकर्सच्या व्यवसायाला आमचा विरोध नाही. तथापि हॉकर्स झोन आणि नो हॉकर्स झोनचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरी जबाबदारी महापालिकेनी पार पाडली पाहिजे. शहरात राहणारा प्रत्येक नागरिक महापालिकेकडे कर देतो. त्यामुळे करदात्याच्या संरक्षणाची जबाबदारी महापालिकेचीच आहे. ती जबाबदारी टाळून नागरिकांची गैरसोय होत असेल तर ते कायद्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही. अन्यथा अशा बाबींमधून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न  डोकेदुखी ठरणारा राहील.
    जळगाव महानगरपालिकेला चंद्रकांत डांगे हे पुर्णवेळ आयुक्त लाभलेले आहेत. गेल्या 35 वर्षाची सत्ता ज्यांचेकडे हेती ती सत्ता उलथून टाकून भाजपला निर्विवाद बहुमताची सत्ता जनतेने दिलेली आहे. आता या मिळालेल्या संधीचे सोनं करण्याची जबाबदारी नव्या सत्ताधार्‍यांची आहे. अन्यथा तुम्हाला  5 वर्षांचा जनता घरचा रस्ता दाखवतील हे विसरता कामा नये. त्यासाठी नो हॉकर्स झोनच्या जागेत हम करे सो कायदा या न्यायाने हॉकर्सना पुन्हा त्या जागेवर बसण्याची परवानगी देण्याची काही नगरसेवकांचा आततायीपणा नव्हे काय? जो नियम तत्कालीन आयुक्तांच्या काळात करण्यात आला होता तो नियम तोडण्याची परवानगी विद्यमान आयुक्तांनी द्यायला नको होती. महापालिकेची नवीन बॉडी अस्तित्वात आल्यानंतर सभागृहात त्यावर साधक – बाधक चर्चा करुन  या प्रश्नाबाबत निर्णय घेता आला असता आयुक्तांनी अशा गोष्टींना वेळीच आवर घातली नाही तर त्यांनाही अवघड जाईल यात शंका नाही. त्याकरिता बेकायदेशीरपणे कोणत्याही गोष्टी होता कामा नये
    जळगावातील हॉकर्स समस्या आणि पार्किंग समस्या या दोन्ही गंभीर असून त्याला प्राथमिकतेने सोडविणे गरजेचे आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif