Friday, August 12, 2022

हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण- एकनाथराव खडसे

- Advertisement -

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

आज रावेर येथे सहकार पॅनलच्या मेळाव्याप्रसंगी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे टीका करत म्हणाले की,  केंद्र सरकारने कृषी संबंधात पारित केलेले तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांचा एकजुटीचा आहे. पण हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे.

- Advertisement -

- Advertisement -

तसेच ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदे रद्द करावे लागले.  केंद्र सरकारने हा उशिरा का होईना पण शहाणपणाचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांवर अत्याचार करण्यात आले. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यांच्यावरती लाठीमार करण्यात आला, यात अनेक शेतकऱ्यांना मरण आले. पण शेतकऱ्यांनी एकजूट दाखवल्यामुळे केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. खरं तर हा निर्णय खूप उशिरा घेण्यात आलेला आहे हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका एकनाथराव खडसे यांनी केली.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या