Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»हुंडयासाठी विवाहितेचा छळ करणा-यांविरोधात गुन्हा
    जळगाव जिल्हा

    हुंडयासाठी विवाहितेचा छळ करणा-यांविरोधात गुन्हा

    By March 16, 2020No Comments10 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा | प्रतिनीधी

    आखतवाडे तालुका पाचोरा येथील विवाहितेच्या माहेरहुण मोटरसायकल घेण्यासाठी पन्नास हजार रुपये आनावे या मागणीसाठी मारहाण करुन तीन मुलांसह घराबाहेर हाकलुन दिल्याने सोनवद ता. शहादा येथील पतीसह सासरच्या पाच जणांवर पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयीत आरोपींना लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पाचोरा पोलिसांनी सांगितले आखतवाडे ता. पाचोरा येथील पितांबर उखर्डू कोळी यांची मुलगी कविता हीचा विवाह सन २००८ मधे सोनवद येथील गणेश सखाराम कोळी याचेशी झाला होता विवाह झाल्यानंतर सुमारे तीन चार वर्षे साररच्या मनळडीने चांगली वागणूक दिल्यानंतर गणेश कोळी याने मोटरसायकल घेण्यासाठी माहेरुन पन्नास हजार रुपये आणावे अशी मागणी करु लागला. तर सासू, सासरे, ननंद व जेठ टोचून बोलून शिवीगाळ करून पतीने अनेकदा मारहाण केली. गेल्या पाच वर्षांपूर्वी कविता सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून माहेरी निघून आल्या नंतर काही दिवसांनी पतीचे त्रास न देण्याचे प्रतीज्ञा पत्र लिहून घेतल्यानंतर वडीलांनी समज काढुन सासरी नांदायला पाठविले परंतू पुन्हा काहीच दिवसांत पैशाची मागणी करत जास्तच त्रास सुरू झाला इकडे वडील मोल मजूरी करून संसार चालवित असल्याने पैशाची मागणी पूर्ण करु शकले नाही यामुळे पती गणेश याने गेल्या दहा महिन्यांपासून दोन मुली व एक मुलासह घराबाहेर हाकलुन दिल्याने अखेर विवाहिता कविता गणेश कोळी हिने गणेश सखाराम कोळी (पती), सखाराम रामदास कोळी (सासरे), कल्पना सखाराम कोळी (सासु), गोरख सखाराम कोळी (जेठ), शितल संजय कोळी (ननंद) रा. सर्व सोनवद, तालुका शहादा यांचे विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विनोद पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif