Tuesday, September 27, 2022

हिवाळा आला.. टाचांच्या भेगापासून त्रस्त आहात; हे घरगुती उपाय करा

- Advertisement -

 लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

हिवाळा आल्याने त्वचेच्या संबंधी समस्या निर्माण होतात. तसेच टाचा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग पण नेहेमीच दुर्लक्ष केला जाणारा. एरवी नखांच्या सौंदर्याचाही बारीक विचार करणारे टाचांच्या नीटनेटकेपणाकडे मात्र दुर्लक्ष करतात.

- Advertisement -

- Advertisement -

टाचांना भेगा पडतात इतकेच नाही तर टाचा अगदी फाटतात तरी त्यावर उपाय करण्याऐवजी त्या झाकण्याचा प्रयत्न केला जातो. आपण वरुन कितीही छान राहाण्याचा आणि दिसण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या टाचा जर भेगाळलेल्या आणि फाटलेल्या असतील तर मग सौंदर्यासाठीचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. सौंदर्य केसांपासून पायांच्या नखांपर्यंत नाही तर टाचांपर्यंत पाहिलं जावं आणि जपलं जावं. यासाठी टाचा सुंदर करण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत ते पाहू या..  या उपायांच्या मदतीने आपण हिवाळ्यामध्ये आपल्या टाचांना हेल्दी बनवू शकतात.

अँटी हील क्रॅक क्रीम

टाचांना भेगा पडण्याची समस्या असल्यास सर्वप्रथम अँटी हील क्रॅक क्रीम किंवा बाम वापरायला सुरुवात करावी. मॉइश्चरायझ आणि एक्सफोलिएटयुक्त हे क्रीम तुमच्या टाचांना सुंदर आणि मुलायम बनवतील. या क्रीमने तुम्हाला खूप फायदा होईल. टाचांना भेगा दूर करण्यासाठी रोज रात्री आधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत आणि मग त्यावर हलक्या हातांनी क्रीम लावावं. हा उपचार नियमित केल्यास भेगा जातात. शिवाय घरातही पायात स्लीपर असू द्यावी म्हणजे टाचा फाटत नाहीत.

मध मॉश्चरायझर

मध हे उत्तम मॉश्चरायझरही आहे. पायाची त्वचा आर्द्र ठेवण्यासोबतच तेथील त्वचेचं पोषणही मध करतं. यासाठी पाण्यात एक अर्धा कप मध घालावं. आणि त्या पाण्यात पाय बुडवून किमान वीस मिनिट बसावं. पाण्यातून पाय बाहेर काढल्यावर मऊ रुमालानं पाय कोरडे करुन घ्यावेत. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास टाचांवर चांगले परिणाम दिसतात.

उपाय 

टाचांच्या भेगा घालवण्याचे उपाय करणं म्हणजे टाचांचं सौंदर्य जपणं नव्हे तर टाचांची नियमित स्वच्छता करणंही गरजेचं आहे. यासाठी आठवड्यातून दोन वेळेस टाचा स्क्रबरने घासून व्यवस्थित स्वच्छ करायला हव्यात. पण म्हणून स्क्रबरने थेट टाचा घासू नये. आधी कोमट पाण्यात थोडं मीठ घालावं. या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत. एक दहा मिनिटं तसं बसून राहिलं तर टाचा मऊ होतात. आणि मग स्क्रब ब्रश किंवा दगड यांच्या सहाय्यानं टाचा हलक्या हातानं घासाव्यात. टाचांवरचा मळ, घाण लगेच निघून जाते. पाय कोरडे पुसून घ्यावेत. आणि सर्वात शेवटी टाचांना खोबऱ्याचं तेल लावावं. या उपायानं टाचा स्वच्छ होतात आणि मुलायमही होतात.

लिक्विड बॅंडेज

पायाच्या भेगा भरून काढण्यासाठी लिक्विड बॅंडेज लावल्यामुळे ते पायाच्या भेगा सील करते. यामुळे क्रॅक वाढण्याची शक्यता कमी होते. हे उत्पादन स्प्रेच्या स्वरूपात येते. एकदा लावल्यानंतर त्याचा प्रभाव बराच काळ टिकतो. ज्यांच्या पायाला खोलवर भेगा पडल्या असतील आणि रक्तस्त्राव होत आहे अशा लोकांसाठी लिक्विड बँडेज हे योग्य उत्पादन आहे. लिक्विड पट्टी नेहमी स्वच्छ आणि कोरड्या त्वचेवर लावावी. जेव्हा टाच फुटते तेव्हा हे कोटिंग त्वचेच्या पृष्ठभागावर दबाव टाकते.

खोबरेल तेल

ज्यांना ड्राय स्किन, एक्जिमा आणि सोरायसिस यासारखा त्रास असतो त्यांना खोबरेल तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. हे तुमच्या त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. कोमट पाण्यात पाय भिजवल्यानंतर खोबरेल तेल वापरणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर टाचेतल्या भेगांमधून रक्तस्त्राव किंवा इन्फेक्शन होऊ शकते असे वाटत असले तरी खोबरेल तेलातील अ‍ॅंटीबायोटीक आणि अ‍ॅंटी मायक्रोबियल गुणधर्म त्याला प्रतिबंध करण्यात मदत करू शकतात.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या