हिरे व्यापाऱ्याची १५ मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या !

0

मुंबई : ऑपेरा हाऊस येथील एका १५ मजली इमारतीच्या गच्चीवरून एका ६१ वर्षीय हिरे व्यापाऱ्याने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली आहे. धीरेनभाई चंद्रकांत शहा असे ६१ वर्षीय हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दादासाहेब भडकमकर (डीबी) मार्ग पोलिसांनी या अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, शहा यांच्या कार्यालयातील टेबलावर पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली.

नेपयन्सी रोडवरील मातृआशिष इमारतीत धीरेनभाई आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले. कार्यालय असलेल्या ऑपेरा हाऊस येथील १५ मजली प्रसाद चेंबर या इमारतीच्या थेट गच्चीवर गेले. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी मारली. उडी मारल्यानंतर शहा जागीच मरण पावले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, शहा यांच्या कार्यालयातील टेबलावर पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली. ‘माझ्या मृत्यूसाठी मी स्वत: जबाबदार आहे. त्यासाठी कुणालाही जबाबदार धरलं जाऊ नये,’ असं त्यात म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.