विहिर खोदकामात अतिमौल्यवान दगड आढळले

0

जामनेर – विहीर खोदकाम सुरु असतांना  भुयारात अतिमौल्यवान वस्तूंचा साठा हिंगणा(ता.सोयगाव)  शिवारातील शेतात आढळून आला. दरम्यान महसूल प्रशासनाने या ठिकाणी रंगबिरंगी दगडांचा साठा जप्त करून विहिरीचे खोदकाम बंद केले आहे.

सोयगाव तालुक्यातील हिंगणा शिवारात गट क्र.३५ मध्ये विहीर खोदकाम करण्याचे काम होती घेण्यात आली असता, विहीर खोदकामासाठी केलेल्या सुरुंग स्फोटात अति मौल्यवान रंगीबेरंगी दगड आढळून आल्याने गोंधळ उडाला होता. दरम्यान तलाटी व नायब तलाटी सतीश देशमुख, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने पंचनामा करून विहिरीचे खोदकाम बंद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.