Saturday, October 1, 2022

हिमा दासची पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी

- Advertisement -

नवी दिल्ली : भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिने चेक रिपब्लिक येथील मेटूजी ग्रँड प्रिक्स अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. हिमाने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली.

- Advertisement -

गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने 400 मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. व्ही. के. विस्मया हिने 52.48 सेकंद अशी कामगिरी करत रौप्यपद पटकावले. सरिताबेन गायकवाड हिने 53.48 सेकंदासह कांस्यपदक तर एम. आर. पूवाम्मा हिने 53.74 सेकंदासह चौथा क्रमांक प्राप्त केला. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या नोह निर्मल टॉम याने 45.06 सेकंदासह रौप्यपदक पटकावले. कझाकस्तानच्या माझेन अल-यासिन याने 45.98 सेकंद अशी कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत मोहम्मद अनास याने 20.95 सेकंदासह रौप्यपदक जिंकले.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या