सोलन : हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी ढाबा आणि गेस्ट हाऊसची इमारत कोसळून 7 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. सोलनमधील कुमारहट्टी या ठिकाणी रविवारी इमारत कोसळली. त्यानंतर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जणांची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमने मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. लष्कराचीही मदत घेण्यात येते आहे. मृतांमध्ये 6 लष्करी जवानांचा आणि एका नागरिकाचा समावेश आहे.
Vivek Chandel, Assistant District Magistrate (ADM), Solan on #Kumarhatti building collapse: 5 casualties have been reported as of now – 1 civilian and 4 defence personnel. 9 more to be rescued. (file pic of the site of collapse) #HimachalPradesh pic.twitter.com/OabCrTa99t
— ANI (@ANI) July 14, 2019
सोलनचे उपायुक्त के. सी चमन यांनीही काही वेळापूर्वीच घटनास्थळी भेट दिली. आत्तापर्यंत 7 जवानांची सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेत 6 जवान आणि 1 नागरिकाचा मृत्यू झाला आहे असेही त्यांनी सांगितले. 7 जवान अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळाला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.