नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधी कुटुंबावर सतत टीका करीत आहे. हिंमत असेल तर नोटाबंदी, जीएसटीवर निवडणूक लढवून दाखवा, असे थेट आव्हान कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केल्यानंतर प्रियांका गांधी यांनी मोदींना दुर्योधन म्हटले होते.
प्रियांका गांधी म्हणाल्या, एक दिल्लीची मुलगी तुम्हाला खुले आव्हान देत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात नोटाबंदीवर लढा, जीएसटीवर लढा, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लढा आणि देशातील तरुणांना तुम्ही जी खोटी आश्वासने दिलीत त्यावर लढा, जी फसवणूक केलीत त्यावर लढून दाखवा, असे त्यांनी म्हटले आहे.