चेन्नई – नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असं वक्तव्य केल्याने अभिनेते कमल हसन यांना अखिल भारतीय हिंदू महासभेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी सोमवारी मेरठमध्ये नथुराम गोडसे यांना दहशतवादी बोलणारे मुर्ख आणि हिंदुच्या नावावर कलंक आहेत अशी टीका केली.
स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादीहिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होतं अस विधान अभिनेत्यापासून नेता झालेल्या कमल हसन यांनी केलं होतं. तामिळनाडू येथील हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेता कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केलं होत. दरम्यान या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली आहे.