Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»हिंगोणा अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देणार
    जळगाव

    हिंगोणा अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देणार

    By February 4, 2020No Comments9 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  यावल-फैजपूर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ झालेल्या डंपर व क्रुझर गाडीच्या अपघातामध्ये चांगदेव, चिंचोल आणि निंबोल येथील एकूण बारा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. घटनेचे वृत्त कळताच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करून रात्री ८ वाजता चांगदेव आणि चिंचोल येथे मृतांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

    याप्रसंगी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपये मिळवून देण्याची घोषणा केली. पालकमंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांनी दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घटनेची माहिती दिली असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. तसेच याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आजच  विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.

    याप्रसंगी पालकमंत्र्यांसमवेत आमदार चंद्रकांत पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, तहसीलदार शाम वाडकर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे,  यांचेसह गोपाळ सोनवणे, अफसर खान, दिलीप पाटील, चांगदेवचे माजी सरपंच पंकज कोळी, अतुल पाटील, संतोष कोळी, हारून शेख आदि उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif