…हा माझा शेवटचा फोटो ; मृत्यूआधी मेजर शर्मांचा कुटुंबियांना व्हॉट्सअॅपवर मेसेज !

0

मेरठ : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आलेले मेजर केतन शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवर फोटोसह एक मेसेज पाठवला होता. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं होतं की, कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल. चकमकीआधी सोमवारी सकाळी सात वाजता त्यांनी हा मेसेज आणि फोटो आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवला होता. हा फोटो शेअर केल्याच्या काही तासातच अनंतनागमधील चकमकीत केतन शर्मा शहीद झाल्याचं वृत्त आलं होतं.अनंतनागमध्ये अचबल भागात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर केतन शर्मा यांना दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आलं.

मेजर शर्मा हे मूळचे मेरठचे आहेत. अवघ्या २९ व्या वर्षी या शूर अधिकाऱ्याने देशासाठी हौतात्म्य पत्करलं. मेजर केतन शर्मा यांचे चुलत बंधू अनिल शर्मा म्हणाले की, “जेव्हा त्यांनी व्हॉट्सअॅप मेसेज केला होता, तेव्हा त्यांच्या पत्नीने रिप्लाय केला होता. पण आम्हाला आशा होती की ते सुरक्षित परत येतील. मात्र बराच वेळ त्यांचा रिप्लाय आला नाही. त्यांची पत्नी इरा मुलीसह माहेरी असताना, केतन शर्मा जखमी झाल्याची माहिती मिळाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास सैन्याचे अधिकारी घरी आले आणि केतन शर्मा शहीद झाल्याचं त्यांनी सांगितलं.”

Leave A Reply

Your email address will not be published.