नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020 -2021 चा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, सर्वसामान्यांनांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्व सामान्यांना जे हवे आहे ते या अर्थसंकल्पातून देण्यात येणार असल्याचे, अर्थमंत्र्यांनी सांगितले. मात्र काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 2020 अर्थसंकल्पाबाबत खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट सादर केलं आहे मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सरळसोट नाही तर गुंतागुंतीचा आहे.रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर होईल असं वाटलं होतं. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.