अहमदपूर : प्रतिनिधी
हाथरस (उत्तर प्रदेश)येथील दलीत कुटुंबातील मुलीवर सामूहीक अत्याचार करून जीवे मारण्याच्या घटनेचा येथील सम्राट मित्रमंडळाच्या वतीने यूवकनेते डाॅ. सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयासमोर धरणे व निदर्शने अंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. तहसिलदार अहमदपूर यांच्या मार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की, हाथरस(उ.प्र.)येथील दलित कुटुंबातील मुलीवर सामूहीक अत्याचार करून तीची जीभ कापून अमानुष कृत्य केले आहे.यात तीचा मृत्यू झाला असून सदरचा खटला फास्ट ट्रॅक न्यायलायात चालवावा,दोषी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.दोषी पोलीस अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावेत,सदरील कुटुंबाचे पुनर्वसन करून पन्नास लाख रुपयांचे सानूग्रह अनुदान मंजूर करावे,देशात अशा घटना घडनार नाहीत याची दक्षता घ्यावी.आदी मागण्या करण्यात आल्या.या वेळी प्रशांत जाभाडे,अजय भालेराव,शिवाजीराव भालेराव,गफारखान पठाण,मेघराज गायकवाड, मोहम्मद पठाण, अँड.सपना गायकवाड,राणी गायकवाड मूज्जमील खूरेशी, मोबीन तांबोळी,तबरेज सय्यद, सय्यद नौशाद,शेख नूर मोहम्मद, सचिन बानाटे,हुसेन कोतवाल,शेख हाशमभाई,शेख मतीन आदींची उपस्थिती होती.