जळगाव (प्रतिनिधी) :- येथील सुभाष चौक येथे भाजीपाला लावण्याच्या वादातून एकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची घटना आज दुपारी घडली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजू सखाराम पाटील (रा. कसमवाडी) यांची दुपारी चॉबे शाळेसमोर पेहलवान (पूर्ण नाव माहित नाही) याच्याशी भाजीपाला हातगाडी लावण्यावरून जुंपली. त्यात पहेलवनाने राजू पाटील यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करीत रक्तबंबाळ केले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन १५ टाके पडले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेत तणाव निवळला. दरम्यान, शनीपेठ पोलिसांनी पेहलवान नामक व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे.