Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»हवाई दलात नोकरीची करण्याची सुवर्णसंधी ; 1500 हून अधिक जागा रिक्त
    ताज्या बातम्या

    हवाई दलात नोकरीची करण्याची सुवर्णसंधी ; 1500 हून अधिक जागा रिक्त

    By April 5, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने ग्रुप सी सिव्हिलियन (IAF Group C) पोस्टवर बंपर भरती जारी केली आहे. या रिक्त जागेसाठी अंतर्गत एकूण 1515 पदांवर भरती होईल. वायु सेना भर्ती मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या रिक्त स्थानाविषयी माहिती देण्यात आली आहे. या रिक्त स्थानाची खास बाब म्हणजे यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारही काही पदांसाठी अर्ज करू शकतात. भारतीय वायुसेनेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार स्टेनो, पर्यवेक्षक, कुक, हाऊस कीपिंग स्टाफ, एमटीएस, एलडीसी, सीएस व एसएमडब्ल्यू, सुतार, लॉन्डरमॅन, हिंदी टायपिस्ट यासह अनेक पदे रिक्त आहेत.

    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत संकेतस्थळ indianairforce.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 3 एप्रिल 2021 पासून सुरु झाली आहे. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 2 मे 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जाची तारीख संपल्यानंतर, अधिकृत वेबसाईटवरून ही लिंक काढली जाईल.

    IAF Group C पदांसाठी असा करा अर्ज
    या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम वायु सेना भर्ती बोर्ड indianairforce.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. मुख्यपृष्ठावरील भरती(Recruitment) विभागात जा. त्यामध्ये, “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY” या लिंकवर क्लिक करा. यामध्ये ग्रुप सी(Group C) पर्यायावर जाऊन नोंदणी करा. नोंदणी फॉर्म डाउनलोड करा. त्याचवेळी, अधिसूचनेत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत अर्ज प्रक्रिया चालू राहते.

    या तारखा लक्षात ठेवा
    अर्ज प्रारंभ तारीख – 3 एप्रिल 2021
    अर्ज करण्याची अंतिम तारीख – 2 मे 2021

    या पदांवर होईल भरती
    वेस्टर्न एअर कमांड – 362
    दक्षिणी हवाई कमांड – 28
    ईस्टर्न एअर कमांड – 132
    सेंट्रल एअर कमांड- 116
    देखभाल कमांड – 479
    प्रशिक्षण कमांड – 407
    हाऊस किपिंग स्टाफ (महिला स्कॅव्हेंजर) – 345
    कुक – 124
    एमटीएस (मल्टी टास्किंग स्टाफ) – 404
    एलडीसी – 53
    स्टोअर कीपर – 15
    हिंदी टायपिस्ट – 12
    चालक – 49

    वयोमर्यादा
    सर्व पदांसाठी किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे आहे. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये 10 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

    निवड प्रक्रिया
    यात निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेस हजेरी लावावी लागते. लेखी चाचणी शैक्षणिक गुणवत्तेवर आधारीत असेल. या लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, न्युमेरिकल अॅप्टीट्युड, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस या विषयांचा समावेश असेल. हा पेपर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत येईल.

    जाहिरात (Notification): पहा

    अर्ज (Application Form): पहा

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif