हवाई दलाच्या IAF Jaguar विमानाचा अपघात !

0

अंबाला – भारतीय हवाई दलाचं IAF Jaguar विमानाचा आज सकाळी अंबाला एअरबेस स्टेशनवर मोठा अपघात टळला. विमानाच्या इंधन टाकीला पक्ष्याने धडक दिल्याने आग लागली. त्यामुळे विमानाचा काही भाग रहिवासी परिसरात कोसळला. मात्र या दुर्घटनेमुळे कोणतीही हानी झाली नसल्याचं हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

या लढाऊ विमानानं आज सकाळी अंबाला एअरफोर्स स्टेशनवरून उड्डाण घेतलं होतं. विमानाच्या उड्डाणानंतर काही वेळातच एका पक्ष्याने विमानाच्या इंधन टाकीला धडक दिल्याने आग लागली आणि इंधनाच्या टाकीचा काही भाग रहिवासी भागात कोसळल्याने खळबळ उडाली. दरम्यान, पायलटने प्रसंगावधान राखत विमानाचं तातडीनं लॅंडिंग केले.  इंधनाच्या टाकीचा काही भाग बलदेवनगर परिसरात जमिनीवर कोसळल्यामुळे या परिसरातील स्थानिकांना खूप मोठा आवाज ऐकायला आला. कोसळलेल्या भागातील घरांना तडे गेले आहे. काही दिवसांपूर्वी 8 जून रोजी गोव्यातील दाबोळी विमानतळावर मिग 29 के या विमानाच्या इंधनाची टाकी कोसळून या टाकीने पेट घेतल्यामुळे विमान सेवेवर परिणाम झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.