हळदीच्या दिवशीच तरुणाची आत्महत्या

0

नाशिक : बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका तरुणाने गंगापूररोडवरील बळवंतनगर भागात आत्महत्या करीत जीवन संपविले. हळदीच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. निखिल प्रकाश देशमुख (वय ३० रा. हरिकृपा रो-हाऊस, पंचवटी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

उच्च शिक्षित असलेला निखिलचा आज, शनिवारी (दि.२०) विवाह होता. त्यामुळे देशमुख कुटुंबात शुक्रवारी (दि.१९) हळदी समारंभाची तयारी सुरू होती. निखिलच्या आत्महत्येची बातमी समोर आली अन् आनंदाचा सोहळा दु:खात बुडाला. निखिलच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला जात आहे. दरम्यान घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली असून, त्यात स्वत: जीवन संपवित असल्याचा उल्लेख आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार गोपाळ पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.