हळदीचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

0

चार हजार वर्षापूर्वीपासून हळदीचा वापर केला जात आहे. यामधील कक्र्युमिनसारखे अनेक औषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून आपला बचाव करतात. हळदीला दुस-या औषधी पदार्थामध्ये मिसळून वापरल्यास त्याचे अनेक फायदे होतात..

मजबूत हाडे : अर्धा चमचा हळद, अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

मजबूत हिरडय़ा : अर्धा चमचा हळद, चिमुटभर मीठ आणि एक चमचा मोहरीचे तेल मिसळून हिरडय़ांची मालिश करा.

चमकदार दात : अर्धा चमचा हळदीमध्ये अर्धा चमचा खातासोडा मिसळून दात घासल्याने दात चमकतात.

सर्दी-पडसे, ताप : एक चमचा शुद्ध तुपामध्ये अर्धा चमचा हळद भाजून घ्या. हे मिश्रण मधामध्ये मिसळून खा.

जखम : जखमेवर अर्धा चमचा भाजलेली हळद आणि मध लावल्याने हे अँटिबॅक्टेरियलचे काम करते.

जखम : अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चुना एक चमचा मधामध्ये मिसळून लावा. हळदीचे दूध नियमित प्या.

घशात वेदना : एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या करा. हळदीचे दूध प्या.

त्वचारोग : एक चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा हळद मिसळून त्वचारोगावर नियमित लावा.

Leave A Reply

Your email address will not be published.