Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»हलगर्जीपणा करणा-या कर्मचा-यांवर कारवाई होणार :- डॉ.राजेश सोनवणे
    जळगाव

    हलगर्जीपणा करणा-या कर्मचा-यांवर कारवाई होणार :- डॉ.राजेश सोनवणे

    By July 2, 2019No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आढावा बैठकीत दिला इशारा

    जामनेर : – सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्व आरोग्य कर्मचारी यांनी विशेष काळजी घेऊन आपल्या मुख्यालयी उपस्थित राहावे.तसेच पुढील आठवड्यात तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देऊन मान्सुनपुर्व आढावा बैठक घेण्यात येणार असून यावेळी अनाधिकृत गैरहजर राहणाऱ्या व कामात हलगर्जीपणा करणा-या कर्मचा-यांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी सांगितले.

    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. कमलापूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील फत्तेपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.श्री.सोनवणे पुढे म्हणाले की,साथीच्या रोगाची व किटकजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना बाबत ग्रामपंचायतींना लेखी सुचना देण्यात आले असून सर्व आरोग्य केंद्रानी साथरोग पथकांची स्थापना करून त्यात वैद्यकिय अधिकारी,आरोग्य सहाय्यक,दोन आरोग्य सेवक,परिचर,चालक यांचा सहभाग करावा.माता बाल संगोपनाचे कामकाज मागील वर्षाप्रमाणे करून १०० टक्के गरोदर माता व बालकांना आरोग्य सुविधा देण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून सन २०१८ -१९ मध्ये फत्तेपुर केंंद्राचे कामकाज अतिशय उत्कृष्ट असून एकूण १८४ प्रसूती तसेच कुटुंब कल्याण नियोजनांच्या २८३ शस्त्र क्रिया करण्यात आल्या पैकी दोन अपत्यावर १७७ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.९३१ गरोदर माता व ० ते ६ महिन्याच्या ८३८ बालकाच्या ४ तपासण्या पूर्ण करण्यात आल्या.गोवर रुबला मोहिमे अंतर्गत १४०८८ बालकांना नियोजनबद्ध पद्धतीने इंन्जेक्सनद्वारे गोवर रुबेला लस देण्यात आली असून २८० मातांना प्रधाममंत्री मातृत्व वंदन योजनेचा पहिला,दुसरा,तिसरा हफ्ता देण्यात आला.२९३ मातांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात आला.याप्रसंगी प्रा. आ.केंद्र फत्तेपुर येथे सर्वाधिक प्रसूती केलेल्या कलिंदा सानप, वैशाली खंडारे सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या वैशाली खंडारे,प्रतिभा वानखेडे व आर.सी.एच.नोंदणी मध्ये सुरेखा गोसावी,कविता वाहुले,के.एस. सानप यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.पल्लवी सोनवणे,डॉ.विवेक जाधव, डॉ.श्यामल इंगळे आदिसह आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत वानखेडे यांनी केले तर आभार पी.के.वाणी यांनी मानले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif