मुंबई – कोट्यवधी रूपये खर्च करून, मोठा गाजा-वाजा करीत कोविड-१९ च्या रूग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा बुधवारी उघड झाला. अॅम्ब्युलन्सची अनुप्लब्धता, व्हेंटिलेटर-ऑक्सिजन खाटांच्या नियोजनातील ढिसाळपणा आणि मुर्दाड यंत्रणेचा फटका बसल्याने टीव्ही 9 मराठी’चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा ४२ व्या वर्षी हकनाक बळी गेला. रायकर यांच्या
प्रकृतीबाबत ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू होणे ही एक दुर्दैवी बाब आहे”, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले आहेत. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवरदेखील निशाणा साधला आहे.
“पत्रकार पांडुरंग रायकर यांना निव्वळ रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांचं दुर्देवी निधन झालं. राज्य सरकारकडून योग्य सुविधा नाहीत. या असुविधेचा हा बळी आहे. या प्रकरणात ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे”, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली