“हमारा तिरंगा प्यारा” कार्यक्रम उत्साहात

0

जळगाव : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘अनेकतेतून एकता’ तसेच आपला भारत देश व राष्ट्रध्वजा विषयी प्रत्येकाच्या मनात स्नेहाची व आपुलकीची भावना असावी या उद्देशाने, रिंग रोड वृंदावन अपार्टमेंट मधील सौ. मीना सुनील बियाणी यांनी ” हमारा तिरंगा प्यारा ” हा कार्यक्रम आयोजित केला होता. तिन्ही  रंगांचे आगळे महत्त्व असणारा भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज आपल्या कल्पकतेतून, वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून, अतिशय समर्पक रीतीने लहान-मोठ्या स्पर्धकांनी तयार करून, संस्कृती,विज्ञान, महान नेते, भारतीय सैनिक,  यांच्याविषयी आदरातीत असे  घोषवाक्य लिहून आपआपल्या राष्ट्रभावना जागृत केल्या. स्पर्धकांमध्ये अनोखी कोठारी, निशा कोठारी, श्याम गांधी ,रत्नप्रभा गांधी,शिखा काबरा, अंजनी शारदा, गौरी बियाणी, रिया गांधी, जयश्री साबू , श्रद्धा  लढे,सुशीला बाहेती ,आशा भुतडा, संगीता गांधी ,रूचीता काबरा, गौरी लखोटिया, रश्मी गांधी,अमन लढे, श्री साबू, एकांश लोया, पलक गांधी यांनी सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.