हद्‍दपार आरोपी तलवारीसह पोलिसांच्या जाळ्यात

0
       भुसावळ-येथील  वांजोळा रस्त्यावरील स्टार लॉन जवळ एक  तरुण हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके,उपविभागीय  पोलीस अधिकारी गजानन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शना खाली  बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोहेकॉ.माणिक सपकाळे, पोना.रविंद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर,पोकॉ उमाकांत पाटील,कृष्णा देशमुख,विकास सातदिवे,ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्‍या पथकाने धाव घेत सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.           तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या आरोपीचे नाव अमोल काशिनाथ राणे  (वय-२३) रा.श्रीराम नगर वांजोळा रोड भुसावळ असून
 त्याच्‍या ताब्‍यातून एक तलवार जप्‍त करण्‍यात आली.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग ६, गुरन.५९४/२०१९ आर्म अँक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल राणे हा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे व त्यास एक वर्षाकरीता हद्‍दपार केले असतांना सुध्दा महाराष्ट्र शासन तसेच पोलीस विभागाच्‍या आदेशाचे उल्लंघन करुन भुसावळ शहरात मिळुन आला म्हणुन त्यावर  मुबंई पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात  आला.तपास  पोहेकॉ जयराम खोडपे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here