हतनूर धरणात केवळ मृत साठा शिल्लक ; पाणी आवर्तनाचा प्रश्न गंभीर

0
भुसावळ  दि 16 –
भुसावळ  तालुक्यातील संजीवनी म्हणून ओळख असलेल्या हतनूर धरणाची अवस्था अतिशय खराब झाली असून अनेक  शहराना पाणीपुरवठा करणारे अनेक गाव ज्याच्यावर विसंबून असना-या    धरणात आता फक्त मृत साठा शिल्लक राहिला आहे.
     यामुळे यंदा पाऊस कसा व कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
गेल्या वर्षी “अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने   आधीच हतनूर धरण भरले नव्हते. त्यातच यंदाच्या वाढत्या तापमाना मुळे पाण्याचे  बाष्पीभवन लवकरात लवकर व मोठ्या प्रमाणावर  होत असून पाणी साठा फारच  कमी होत चालला आहे ,  यातच धरणातील जिवंत पाणी साठा नष्ट झाला असून फक्त मृत साठा उरला आहे. १९९२ नंतर अर्थात तब्बल 25 ते 26 वर्षांनंतर अशी भयंकर अवस्था ओढवली आहे हे विशेष. हतनूरमध्ये केवळ १३३ दलघमी मृत साठा शिल्लक आहे. यातही गाळाचे प्रमाण लक्षात घेता फक्त २४.६७ दलघमी क्षेत्रातच साठा आहे. सध्या धरणाच्या खालील भागात असणार्या भुसावळ शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथे आधी एक आवर्तन सोडण्यात आले असून ते तीन-चार दिवसांमध्ये समाप्त होऊ शकते. यामुळे भुसावळकरांसाठी आवर्तन अत्यावश्यक आहे. आता जिवंत पाणी साठा नष्ट झाल्यामुळे मृत साठ्यातूनच आवर्तन सोडण्यात येईल हे स्पष्ट झाले आहे.परंतु हा साठा किती दिवस पुरणार ही चिंतेची बाब ठरली आहे .
Leave A Reply

Your email address will not be published.