भुसावळ : गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाल्याने आज सकाळी नऊ वाजता धरणाचे बारा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून 9748 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

दरम्यान, आज सकापासूनच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
