हज यात्रेचा फार्म भरण्यासाठी लावण्यात आलेल्या आय.टी. रिटर्नची अट रद्द करा

0

फैजपूर प्रतिनिधी ।  मुस्लिम बांधवांच्या २०२१ मधील पवित्र हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी फार्म भरण्यासाठी लावण्यात आलेली आय. टी.रिर्टनची अट शासनाने रद्द करावी अशी मागणी यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यक विभागाच्या वतीने उपविभागीय प्रांत अधिकारी कैलास कडलक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी फार्म भरण्यासाठी लावण्यात आलेली आय. टी.रिर्टनची अट शासनाने रद्द करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी यावल तालुका काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सैय्यद इखलास ईरशाद भाई , नगरसेवक कलीम खान ,जावेद जनाब, मारूळचे माजी सरपंच अकील भाई ,मसरूर अली सईद, राज मोहम्मद रहमान खाटीक हसरत अली मतिउर्रह्मान पिरजादे, नदीम अख्तर, नफीस फ़ारूक़ी, सुल्तान भाई,हज़रत अली. मुदस्सर अली यांच्यासह अल्पसंख्यांक समाजातील सामाजीक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.