स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटीच्या पॅकेजची पंतप्रधान मोदींची घोषणा

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन ‘स्वावलंबी भारत’ संकल्पाचा नारा दिला. कोरोनामुळे जग संकटात आहे, मात्र या संकटासमोर शरण पत्करेल तो मानव कसला. २१ वं शतक भारताचं आहे. कोरोनाच्या या संकटाचं रुपांतर संधीत करुन भारताला स्वावलंबी बनवू असं पंतप्रधान मोदी म्हणाले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियान पॅकेज जाहीर केलं. 20 लाख कोटी रुपयाचं हे पॅकेज आहे.

‘करोना महामारी सुरू होऊन आता चार महिने उलटलेत. ४२ लाखांहून अधिक लोक करोनाबाधित आहे. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेक कुटुंबांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत. मी या सर्वांप्रती आपली संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसनं जगाला उद्ध्वस्त केलंय. जगभरात करोडो लोक संकाटाचा सामना करत आहेत. आम्ही असं संकट ना पाहिलंय ना ऐकलंय… निश्चितपणे मानवजातीसाठी हे सगळं अकल्पनीय आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. थकवा, हरणं, तुटणं मानवाला मंजूर नाही. सतर्क राहताना नियमांचं पालन करत यापासून संरक्षण करून पुढे वाटचाल करायची आहे. जग संकटात असताना आपला संकल्प आणखीन मजबूत करायला हवा. संकटापेक्षाही आपला संकल्प विराट हवा’, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली. चौथ्या लॉकडाऊनचे नियम 18 मे पूर्वी जाहीर करणार, चौथा लॉकडाऊन नव्या नियमांसह असेल असं मोदी म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.