स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ग्रीन फाउंडेशन यांच्या कार्यक्रमांद्वारे अभिवादन

0

भातखंडे (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी. त्यानिमित्त जिल्ह्य़ातील ठिकठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न.ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी आज स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आजही त्यांचे विचार आजही गारूड करून आहेत. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार व्यक्तीची निराशा दूर करु शकतात. त्यांच्या नवीन ऊर्जा निर्माण करू शकतात. असेच त्यांचे काही विचार खालीलप्रमाणे…

– उठा, जागे व्हा!! जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका!

– ध्येयासाठी जगणे, हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा. खडतर परिश्रम करा. म्हणजे तुम्ही निश्‍चित ध्येयाप्रत पोचू शकाल.

– मी त्या देवाचा सेवक आहे, ज्याला अज्ञानी मनुष्य म्हणतात.

– सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.

– तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्या साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन श्री.बाळासाहेब कोळपे यांनी  शुभेच्छा दिल्या. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदरा केसकर वस्ती येथे वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, झाडांना पाणी ,झाडांना आळी करण्यात आली या वेळी दत्तात्रय शेंडगे, किरण भोसले ,विजय बोडके,राहुल कुंभार, अमित कुंभार, प्रितम पाटील, कर्तिक जाधव, बिरूदेव भास्कर, वैभव बाचकर, निरक बिका,निलेश खोले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here