स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा…गजानन बाबर यांचा इशारा

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्यातील रास्त भाव दुकानदार यांच्या मागण्या मान्य न झाल्यास धान्य वितरण बंद करण्यात येतील असा इशारा माजी खासदार व स्वस्त धान्य दुकानदार फेडरेशनचे राज्याध्यक्ष गजानन बाबर यांनी प्रधान सचिव विलास पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑल महाराष्ट्र रेशनिंग फेडरेशनच्या वतीने व अध्यक्ष या नात्याने मी आपणास विनंती करू इच्छितो की , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व राज्यांमध्ये वाढत आहे रुग्णांची संख्याही वाढत आहे यासाठी राज्य शासनाने 14 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 8 वाजल्यापासून लाॅकडाऊन जाहीर केला आहे, वास्तविक पाहता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वाढत असल्याने व ही संख्या लाखाच्या घरात गेल्याने राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे यामुळे निश्चितच कोरोना प्रादुर्भावला तसेच साखळी तुटायला मदत होईल.

राज्यामध्ये संचारबंदी चालू झाली आहे 144 कलम लागलेले आहे व अशा परिस्थितीमध्ये रास्त भाव रेशनिंग दुकानदार यांना धान्य वितरण करण्यासाठी सांगितले आहे परंतु आमची शासनाला विनंती आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रास्तभाव रेशनिंग दुकानदारांच्या व लाभार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी रास्त भाव दुकानदार यांना स्वतःचे अंगठे, आधार अधिप्रमाणित करूनच धान्य वितरण मुभा देण्यात यावी अन्यथा राज्यातील रास्त भाव रेशनिंग दुकानदार धान्य वितरण करणार नाहीत. संपावर जातील याची आपण नोंद घ्यावी तसेच या निवेदनाद्वारे मी राज्यातील सर्व रास्तभाव रेशनिंग दुकानदारांना विनंती करतो की , जोपर्यंत  राज्यात शासन आपल्याला स्वतःचे आधार अधीप्रमाणित करून धान्य वितरण करण्याची मुभा देत नाहीत शासन आपली सुरक्षा पाहत नाही तोपर्यंत कोणीही धान्य वितरण करू नये.असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.