मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण नोंदवली गेली. या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या लगीन सराईचा देखील काळ असून यात सोन्याची घसरण झाल्याने सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.
मुंबईच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48560 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 46620 रुपये नोंदवले गेले. पुण्याच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48,560 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45860 रुपये नोंदवले गेले. नागपूरच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48620 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 46620 रुपये नोंदवले गेले.
नाशिकच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48360 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 45860 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलो मागे 60700 रुपये नोंदवले गेले. औरंगाबादच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48,560 रुपये नोंदवले गेले.
सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात पाचशे ते सहाशे रुपयांची पडझड पाहायला मिळाली. या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण होण्याचा अंदाज आहे. कोरोना विषाणूचा सोन्याच्या दरावर कसलाही परिणाम होणार नाही. कारण कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तर गंभीर होण्याचा धोका कमी आहे. त्यामुळे ग्राहकी चांगली राहिली आहे. बाजारात उलाढालाही चांगली होत आहे.
आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर
मुंबई – 48560
पुणे – 48,560
नाशिक – 48360
नागपूर – 48620
औरंगाबाद – 48620