मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर येथे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व तरुणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
स्वामी विवेकानंद म्हणजे आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा निरंतर झराच आहे. आजचा तरुण हा इतर मार्गाकडे गुरफटलेला आहे. तेव्हा आपल्यासमोर असलेलं उद्दिष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत थांबू नये असा स्वामींच्या संदेशाचे पालन केल्यास मोठा बदल घडून येऊ शकतो असे अनेक उदाहरणे देत बंधू आणि भगिनींनो याचा अर्थ ही महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी यावेळी समजून सांगितला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून राष्ट्रमाता जिजाऊ यांचा स्वराज्य निर्मितीसाठी मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन केले आहे. शिवबांना अगदी बालपणापासूनच तलवारबाजी, महाभारतातील प्रसंग, आक्रमकता विषयी अनेक धडे दिले. मुघलांकडून होत असलेला अन्याय त्याविषयी असलेली चीड राष्ट्रमाता जिजाऊ ने आपल्या मनात शिवबाच्या रूपातून नष्ट करण्याचे स्वप्न बघितल होतं आणि शिवरायांनी ते सत्यामध्ये उतरविले. असे अनेक दाखले देत आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले.
शहाजी महाराजांच्या निधनानंतर अठराव्या शतकामध्ये जेव्हा कडक सती प्रथा होती, तेव्हा त्या सती गेल्या नाहीत तर त्यांनी शिवबाला घडविले असे प्रास्तविकेमधून सिव्हिल इंजिनिअरिंग चे प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रम अधिकारी किशोर भगत यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातिल प्राध्यापक नितीन खर्चे, रमाकांत चौधरी, संदीप खाचणे, सुदेश फरफट, राजेश सरोदे, प्रणव फिरके, प्रवीण पाटील, निलेश राजपूत, भूषण ठाकरे, संदीप मुंडाळे सह तेजल खर्चे, स्नेहल पवार आदी उपस्थिती होते.