पाळधी, ता. धरणगाव (वार्ताहर) : पाळधी येथून गेल्या दीड महिन्यापासून मच्छिंद्र उत्तम सोनवणे यांच्या मालकीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (MH 19- BG- 0053) नॅशनल हायवे नंबर 6 वरून रात्री चोरीस गेले होते. याबाबत पाळधी पोलीस चौकी येथे फिर्याद देण्यात आली. ट्रॅक्टर चोरी गेल्यानंतर शेतकऱ्यांचे ठिबक व बकऱ्या तसेच उभ्या गाडीचे टायर चोरीस गेले आहे. परंतु त्याचा तपास अजूनही चालू आहे. मच्छिंद्र उत्तम सोनवणे हे तपासाची वाट न बघता स्वतः ट्रॅक्टरच्या शोधात रोज सकाळी डबा बांधून जळगाव जिल्हा धुळे जिल्हा तसेच अनेक तालुक्यातील गावे मच्छिंद्र सोनवणे हे स्वतः गावातील लोकांना भेटून आपल्या ट्रॅक्टर चे वर्णन करत असे व आपला मोबाईल नंबर नाव लोकांना देत असत. त्यानंतर जळगाव येथे जाऊन एस पी साहेब यांची दोन वेळा भेट घेतली.
त्यानंतर दोन दिवसांपूर्वी शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावाजवळ ट्रॅक्टर असल्याची बातमी मच्छिंद्र सोनवणे यांना मोबाईलवर माहिती मिळाली. त्यांनी लागलीच पाळधी पोलीस यांच्याशी संपर्क साधला व नरडाना पोलीस पाळधी पोलीस यांनी रस्त्यावर ट्रॅक्टरचा शोध घेण्यास सुरुवात केली. बेटावद रस्त्यावर ट्रॅक्टर उभे असल्याची माहिती मिळाली ट्रॅक्टर जवळ पोहोचण्या अगोदर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पळाला. पुढील तपास सहा पोलीस उप निरीक्षक एच ,एल गायकवाड करत आहे. इतर चोरीचा ही तपास लागेल अशी आशा पाळधीकर करू लागले आहे.
मला खात्री होती माझे ट्रॅक्टर मला मिळेल. माझे ट्रॅक्टर पोलिसांच्या साह्याने मिळाले व दैनिक लोकशाहीचे मानले आभार.
– मच्छिंद्र सोनवणे